महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

तब्बल ३१ वर्षानंतर भारताला मिळाला व्हाईटवॉश!

तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या द्विदेशीय एकदिवसीय मालिकेत भारताला तिसऱ्यांदा व्हाईटवॉश पत्करावा लागला आहे. यापूर्वी १९८३-८४ आणि १९८८-८९ मध्ये वेस्ट इंडिजने ५-० असा विजय मिळवला होता.

team india get whitewash after 31 years
तब्बल ३१ वर्षानंतर भारताला मिळाला व्हाईटवॉश!

By

Published : Feb 11, 2020, 5:03 PM IST

माउंट माउंगानुई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना माउंट माउंगानुईच्या 'बे ओव्हल'वर खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने ५ गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने भारताला ३-० ने व्हाईटवॉश दिला आहे.

हेही वाचा -न्यूझीलंडनं टी-२०तील पराभवाचे उट्टे काढले, वन-डे मालिकेत भारताला दिला व्हाईटवॉश

या पराभवामुळे तब्बल ३१ वर्षानंतर भारताला व्हाईटवॉश मिळाला आहे. तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या द्विदेशीय एकदिवसीय मालिकेत भारताला तिसऱ्यांदा व्हाईटवॉश पत्करावा लागला आहे. यापूर्वी १९८३-८४ आणि १९८८-८९ मध्ये वेस्ट इंडिजने ५-० असा विजय मिळवला होता. त्यानंतरही भारताने मालिका गमावल्या आहेत. मात्र, पाऊस त्यांच्या मदतीला धावून आला.

पावसामुळे रद्द झालेले सामने -

  • २०१३-१४ : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, २-० ने पराभूत. (तिसरा सामना रद्द)
  • २००६-०७ : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, ४-० ने पराभूत. (पहिला सामना रद्द)
  • १९९७ : भारताचा श्रीलंका दौरा, ३-० ने पराभूत. (एक सामना रद्द)

माउंट माउंगानुई येथे रंगलेल्या अखेरच्या सामन्यात भारताने दिलेले २९७ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ४७.१ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडने टी-२० मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details