मुंबई -विश्वकरंडक स्पर्धेच्या दरम्यान, टीम इंडियाच्या मध्य फळीतील फलंदाज अंबाती रायडूने क्रिकेटच्या सर्व स्तरांतून अचानक निवृत्तीची घोषणा जाहीर केली होती. आता रायडूने हा निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचे ठरवले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रानुसार रायडूने क्रिकेटच्या मैदानात कमबॅक करण्याचे ठरवले आहे.
रायडू म्हणाला, 'संकटकाळी माझी साथ देण्यासाठी मी चेन्नई सुपरकिंग्स, वीवीएस लक्ष्मण आणि नोएल डेविड यांना धन्यवाद देतो. माझ्यामध्ये खुप क्रिकेट शिल्लक आहे याची मला या लोकांनी जाणीव करुन दिली. मी येत्या हंगामासाठी हैदराबादच्या संघाकडे लक्ष देणार आहे. १० सप्टेंबरला मी या संघासोबत असेन.'