ढाका - बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सलामीवीर फलंदाज तमिम इक्बालला एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तमिम आता मशराफी मुर्तझाची जागा घेईल. १ एप्रिलपासून तो संघाची कमान हाती घेणार आहे.
तमिम इक्बाल बांगलादेशचा नवा कर्णधार - Tamim Iqbal latest news
संचालक मंडळाच्या बैठकीनंतर बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 'तमिमची नवीन एकदिवसीय कर्णधार म्हणून बोर्डाने एकमताने निवड केली आहे', असे त्यांनी म्हटले.
संचालक मंडळाच्या बैठकीनंतर बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 'तमिमची नवीन एकदिवसीय कर्णधार म्हणून बोर्डाने एकमताने निवड केली आहे', असे त्यांनी म्हटले.
झिम्बाब्वेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना बांगलादेशचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असेल, अशी घोषणा मुर्तझाने केली होती. बांगलादेशने झिम्बाब्वेला ३-० ने पराभूत करून एकदिवसीय मालिका जिंकली. मुर्तझाने पाच वर्षांहून अधिक काळ संघाची कमान सांभाळली आहे.
मशराफी मुर्तझा आणि शाकिब अल हसन यांना बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) नव्या केंद्रीय करार यादीतून वगळण्यात आले आहे. मशराफी आणि शाकिब व्यतिरिक्त इम्रुल कायेस, अबू हैदर रोनी, सय्यद खालिद अहमद, रुबल हुसेन आणि शादमान इस्लाम यांनाही या करारामधून वगळण्यात आले आहे.