मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडकाचा अंतिम सामना मेलबर्नच्या एमसीजी स्टेडियमवर रंगला आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. यामुळे अंतिम सामन्यातही भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. यंदाच्या स्पर्धेतील विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला २०१८ सालाच्या विश्वकरंडकाच्या तुलनेत तब्बल ३२० टक्के अधिक बक्षीसाची रक्कम मिळणार आहे.
आयसीसी यंदाच्या महिला टी-२० विश्वकरंडाच्या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेत मोठी वाढ केली आहे. यंदा विजेत्या संघाला ७.१६ कोटी, तर उपविजेत्यांना ३.५८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.