महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात २० वे षटक निर्धाव टाकणारे गोलंदाज; भारताचा 'हा' युवाही सामील - last over maiden

आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील शेवटचे २० वे षटक निर्धाव टाकणारे महारथी गोलंदाज. अशी कामगिरी न्यूझीलंडचा जीतेन पटेल, पाकिस्तानचा मोहम्मद आमिर, सिंगापूरचा जनक प्रकाश आणि भारताचा युवा गोलंदाज नवदीप सैनीने केली आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात २० वे षटक निर्धाव टाकणारे गोलंदाज; भारताचा 'हा' युवाही सामिल

By

Published : Aug 5, 2019, 4:39 PM IST

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये निर्धाव षटक टाकणे हे गोलंदाजासमोरील मोठे आव्हान असते. मात्र, असे काही गोलंदाज आहेत. ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील शेवटचे २० वे षटक निर्धाव टाकण्याची किमया केली आहे. पाहूयात कोण आहेत ते गोलंदाज...

जीतेन पटेल (न्यूझीलंड) -

न्यूझीलंडचा फिरकीपटू जीतेन पटेल...
भारतीय वंशाचा किवी फिरकीपटू जीतेन पटेल याने २००८ साली झालेल्या न्यूझीलंड विरुध्द वेस्ट इंडिज टी-२० सामन्यात २० वे षटके निर्धाव टाकले आहे. वेस्ट इंडिज सारख्या स्फोटक फलंदाज असणाऱ्या संघाविरुध्द जीतेन निर्धाव षटक टाकत आपल्या नावे विक्रम प्रस्थापित केला. असा कारनामा करणारा तो पहिलाच आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरलेला आहे.

मोहम्मद आमिर (पाकिस्तान) -

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिर...
पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिरने २ मे २०१० मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या सामन्यात २० वे षटक निर्धाव टाकले. आमिरने या षटकात ऑस्ट्रेलियाचे तीन गडीही तंबूत धाडले. महत्वाची बाब म्हणजे या षटकात ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमावले होते. त्यामध्ये आमिरचे तीन आणि धाव बाद दोन असा समावेश आहे.

जनक प्रकाश ( सिंगापूर) -

सिंगापूरचा जनक प्रकाश...
मूळचा भारतीय वंशीय सिंगापूर संघाचा गोलंदाज जनक प्रकाशने याच वर्षी झालेल्या कतार संघाविरुध्द सामन्यात २० वे षटक निर्धाव टाकले. तब्बल ९ वर्षानंतर, आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात गोलंदाजाने २० वे षटक निर्धाव टाकले होते. यापूर्वी मोहम्मद आमेरने २०१० मध्ये हा कारनामा केला होता.

नवदीप सैनी (भारत) -

भारताचा जलदगती गोलंदाज नवदीप सैनी...
भारताचा युवा जलदगती गोलंदाज नवदीप सैनीनेही हा पराक्रम केला आहे. सैनीने ३ ऑगस्ट २०१९ ला झालेल्या वेस्ट इंडिज विरुध्दच्या सामन्यात २० वे षटक निर्धाव टाकले. या षटकात सैनीने निकोलस पूरम, शिमरोन हेटमायर आणि किरॉन पोलार्ड याला बाद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details