लेइसेस्टर (दक्षिण आफ्रिका ) - आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अनेक वेगवेगळे विक्रम होत असून यामध्ये आता आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेचा २८ वर्षाचा गोलंदाज कॉलीन अॅकरमन याने आज ( गुरुवारी ) टी-२० क्रिकेटमध्ये कोणालाही न जमलेली कामगिरी केली आहे. गोलंदाजीत त्याने ४ षटकात केवळ १८ धावा देत तब्बल ७ फलंदाजांना तंबूत धाडले.
VIDEO : विश्वविक्रम...आफ्रिकेच्या फिरकीपटूने केली १८ धावांत ७ फलंदाजांची शिकार - 7-18 to claim record
दक्षिण आफ्रिकेचा २८ वर्षाचा गोलंदाज कॉलीन अॅकरमन याने आज ( गुरुवारी ) टी-२० क्रिकेटमध्ये कोणालाही न जमलेली कामगिरी केली आहे. गोलंदाजीत त्याने ४ षटकात केवळ १८ धावा देत तब्बल ७ फलंदाजांना तंबूत धाडले.
![VIDEO : विश्वविक्रम...आफ्रिकेच्या फिरकीपटूने केली १८ धावांत ७ फलंदाजांची शिकार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4074443-thumbnail-3x2-kk.jpg)
फिरकीपटू कॉलीन अॅकरमन याने लेइसेस्टरशायर क्लबकडून खेळताना हि विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. लेइसेस्टर क्लबच्या ६ बाद १८९ धावांचा पाठलाग करताना बर्मिंगहॅम बेअर्स संघाचा संघ १३४ धावांवर ढेपाळला. लेसेस्टरच्या या विजयाचा नायक ठरला कॉलीन. त्याने ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १८ धावा देत तब्बल ७ गडी बाद केले.
कॉलीने याने केलेली ही कामगिरी टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी हा विक्रम सोमरसेटच्या अॅरूल सुफीया याच्या नावावर होता. त्याने २०११ मध्ये ग्लॅमोर्गन क्लबविरुद्ध ५ धावांत ६ बळी बाद केले होते. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी कॉलिन याने हा विक्रम मोडला.