महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी टी नटराजन तामिळनाडू संघात - t natarajan included in tamil nadu team

बीसीसीआय विजय हजारे एकदिवसीय करंडक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. तामिळनाडू संघाने या स्पर्धेच्या तयारीला सुरूवात केली असून भारताचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याला तामिळनाडूने आपल्या संघात घेतले आहे.

t natarajan included in tamil nadu vijay hazare squad
विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी टी नटराजन तमिळनाडू संघात

By

Published : Feb 4, 2021, 4:31 PM IST

चेन्नई - सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा नुकतीच पार पडली. बीसीसीआय या स्पर्धेनंतर आता विजय हजारे एकदिवसीय करंडक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. तामिळनाडू संघाने या स्पर्धेच्या तयारीला सुरूवात केली असून यात भारताचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याला तामिळनाडूने आपल्या संघात घेतले आहे.

तामिळनाडू संघाने दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात नुकतीच पार पडलेली सय्यद मुश्ताक अली स्पर्धा जिंकली. आता तामिळनाडूचा संघ विजय हजारे स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. या स्पर्धेसाठी तामिळनाडू संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिककडेच सोपविण्यात आले आहे. तर अष्टपैलू बाबा अपराजित यांच्याकडे उपकर्णधार पद देण्यात आलं आहे. याची माहिती तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

तामिळनाडू क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ता एस. वासुदेवन यांनी सांगितले की, 'विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी आम्ही टी नटराजन याला तामिळनाडू संघात सामिल करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, आम्ही बीसीसीआय नटराजन याला ही स्पर्धा खेळण्याची परवानगी देईल का? याची आम्ही वाट पाहत आहोत.'

असा आहे विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी तामिळनाडूचा संघ -

दिनेश कार्तिक (कर्णधार), बाबा अपराजित (उपकर्णधार), बी इंद्रजीत, केबी अरुण कार्तिक, हरी निशांत, शाहरुख खान, एन जगदीशन, एल सूर्यप्रकाश, कौशिक गांधी, जे कौशिक, मुरुगन अश्विन, साई किशोर, एम सिद्धार्थ, सोनू यादव, के विग्नेश, टी नटराजन, अस्विन क्रिस्ट, प्रदोष रंजन पॉल, जी पेरियासामी आणि एम मोहम्मद.

हेही वाचा -IND vs ENG: अजिंक्य रहाणेची संघनिष्ठा; कर्णधार विराटबद्दल म्हणाला...

हेही वाचा -Ind vs Eng : पाहुण्या संघाला जबर धक्का; पहिल्या २ कसोटीतून बाहेर पडला सलामीवीर

ABOUT THE AUTHOR

...view details