सिडनी - वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय कसोटी संघात टी नटराजनची वर्णी लागली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. यासामन्यासाठी भारतीय संघाने कस्सून सराव केला. यात टी नटराजन याने क्षेत्ररक्षणादरम्यान, पकडलेला झेलचा व्हिडिओ बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी सराव सत्रात घाम गाळला. यादरम्यान, संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्यासोबत टी नटराजनने फिल्डिंगचा सराव केला. यात टी नटराजनने धावत जाऊन कॅच पकडला. याचा कॅचचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.