मुंबई- सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना 26 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. याचे वेळापत्रक समोर आले आहे. दरम्यान, स्पर्धेचा अंतिम सामना 31 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.
कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, हरियाणा, बडोदा, बिहार आणि राजस्थान या संघांनी बाद फेरी गाठली आहे. कर्नाटक आणि पंजाब यांच्यात 26 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सरदार पटेल स्टेडियमवर स्पर्धेचा पहिला उपांत्यपूर्व सामना खेळला जाणार आहे. त्याच दिवशी दुसरा उपांत्यपूर्व सामना तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश यांच्यात संध्याकाळी 7 पासून खेळला जाईल.