पोचेफस्ट्रम (दक्षिण आफ्रिका) - १९ वर्षाखालील आयसीसी विश्व करंडक स्पर्धेत भारताच्या युवा संघाने पाकिस्तानच्या युवा संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवला आणि अंतिम फेरी गाठली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने शतक तर दिव्यांश सक्सेनाने ५९ धावा केल्या. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे क्रिकेट विश्वातून कौतूक होत आहे.
पाकविरुद्धच्या सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या 'या' खिलाडूवृत्तीचे चाहत्याकडून कौतुक
हैदरला चेंडू लागल्यानंतर पाकिस्तान संघाचे फिजिओ मैदानात आले. त्यांच्या सल्ल्यानंतर अलीने फलंदाजी केली. त्याने ७७ चेंडूत ५६ धावा काढल्या. हैदर बाद झाल्यानंतर पाकचा डाव ढेपाळला. पाकला संपूर्ण ५० षटकेही खेळून काढता आली नाही. भारताच्या भेदक माऱ्यासमोर पाकचा संघ ४३.१ षटकात १७२ धावांपर्यंत मजल मारू शकला.
पाकिस्तानचा कर्णधार रोहिल नाझीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मोहम्मद अवघ्या ४ धावांवर बाद झाला. त्याला सुशांत मिश्राने सक्सेनाकरवी झेलबाद केले. हैदर अली आणि फआद मुनीर ही जोडी मैदानात होती. तेव्हा सुशांतचा उसळता चेंडू हैदरच्या खांद्यावर आदळला. यामुळे हैदर खाली कोसळला. तेव्हा सुशांतने त्याच्याजवळ जाऊन विचारपूस केली. याचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हैदरला चेंडू लागल्यानंतर पाकिस्तान संघाचे फिजिओ मैदानात आले. त्यांच्या सल्ल्यानंतर अलीने फलंदाजी केली. त्याने ७७ चेंडूत ५६ धावा काढल्या. हैदर बाद झाल्यानंतर पाकचा डाव ढेपाळला. पाकला संपूर्ण ५० षटकेही खेळून काढता आली नाही. भारताच्या भेदक माऱ्यासमोर पाकचा संघ ४३.१ षटकात १७२ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताच्या सुशांत मिश्राने सर्वाधिक ३ गडी बाद केले. कार्तिक त्यागी आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी २-२ तर अंकोलेकर आणि जैस्वालने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
TAGGED:
भारत विरुद्ध पाकिस्तान