मुंबई - सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धेत विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव २० सदस्यीय मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. कोरोनामुळे थांबलेला भारतातील घरगुती क्रिकेटचा हंगाम या स्पर्धेपासून सुरू होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने शनिवारी आपल्या वेबसाइटवर मुंबईच्या संघाची घोषणा केली.
हेही वाचा -'या' कारनाम्यामुळे स्मिथ अश्विनला आयुष्यभर लक्षात ठेवेल!
सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त या संघात आदित्य तरे, युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, सिद्धेश लाड आणि अष्टपैलू शिवम दुबे असे नियमित खेळाडू आहेत. धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील तर फिरकी गोलंदाजी अथर्व अंकोलेकर आणि शम्स मुलानी हे गोलंदाज सांभाळतील.
२९ डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर पोहोचल्यानंतर निवडलेल्या सर्व खेळाडूंना कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीला सामोरे जावे लागेल. मुंबईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर सर्व सामने खेळेल. या स्पर्धेचे सामने १० ते ३१ जानेवारी दरम्यान खेळवले जातील.
संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तारे (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आकर्षित गोमेल, सरफराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजित नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मीनाद मांजरेकर, प्रथम दके, अथर्व अकोलेकर, शशांक अतरदे, शम्स मुलानी, हार्दिक तमोर, आकाश पारकर आणि सुफियान शेख.