मुंबई -मुंबई पोलिसांनी ड्रॅगन फ्लाय नाइट क्लबवर सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास धाड टाकून कारवाई केली. यावेळी सुरेश रैनादेखील नाइट क्लबमध्ये उपस्थित होता. तेव्हा पोलिसांनी कारवाई करत रैनासह ३४ जणांना अटक केली होती. अटकेनंतर रैनाची जामीनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईवर सुरेश रैनाने प्रतिक्रिया दिली आहे.
रैनाच्या मॅनेजमेंट टीमकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी, रैना हा एका शूटसाठी मुंबईत आला होता, अशी माहिती दिली आहे. एका मित्राने डिनरसाठी बोलावल्यामुळे रैना ड्रॅगन फ्लाय नाइट क्लमध्ये गेला होता. त्याला स्थानिक वेळा आणि प्रोटोकॉलची माहिती नव्हती, असेही त्याच्या मॅनेजमेंट टीमने सांगितले आहे. पुढे त्यांनी, रैनाने या घटनेबाबत खेद व्यक्त केल्याचे सांगत, तो नेहमीच प्रशासनाकडून आखून दिलेल्या नियमांचे पालन करत असून भविष्यातही करत राहील, असे सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण –