नवी दिल्ली - डावखुरा सुरेश रैना हा टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा भारताचा पहिला फलंदाज आहे. 2 मे 2010 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात रैनाने ही कामगिरी केली होती. आज तब्बल 10 वर्षानंतर रैनाने या खेळीची आठवण काढली आहे.
10 वर्षापूर्वीच्या 'त्या' अविस्मरणीय क्षणाची रैनाला झाली आठवण
रैनाने ट्विटरवर म्हटले, "माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक म्हणजे माझ्या देशासाठी पहिले टी-20 शतक. यामुळे मला नक्कीच खूप आत्मविश्वास मिळाला होता.''

वेस्ट इंडिजच्या सेंट लुसियाच्या ग्रॉस इस्लेट येथे टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत रैनाने हे शतक ठोकले. रैनानंतर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनीही भारताकडून टी-20 मध्ये शतके ठोकली आहेत.