महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सुरेश रैनाकडून डु प्लेसिसचे कौतुक, जाणून घ्या कारण - du plessis charity work news

रैना म्हणाला, "आम्हाला तुमचा अभिमान आहे. तू आणि इमारी एकत्रितपणे कोरोनाशी संकटात झगडत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील मुलांना खायला देत आहात. मी लोकांना आवाहन करतो की मदतीसाठी पुढे या आणि मदतीसाठी जे काही शक्य होईल ते करा."

suresh raina lauds faf du plessis charity work in south africa
सुरेश रैनाकडून डु प्लेसिसचे कौतुक, जाणून घ्या कारण

By

Published : Jun 1, 2020, 7:12 PM IST

नवी दिल्ली - भारतीय फलंदाज सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि त्याच्या पत्नीचे कौतुक केले आहे. डु प्लेसिसने आफ्रिकेतील 3500 भुकेलेल्या मुलांना जेवण दिले होते. कोरोनामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. रैना आणि डु प्लेसिस चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सदस्य आहेत.

रैना म्हणाला, "आम्हाला तुमचा अभिमान आहे. तू आणि इमारी एकत्रितपणे कोरोनाशी संकटात झगडत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील मुलांना खायला देत आहात. मी लोकांना आवाहन करतो की मदतीसाठी पुढे या आणि मदतीसाठी जे काही शक्य होईल ते करा."

रैनाच्या ट्विटवर उत्तर देत डु प्लेसिसने त्याचे आभार मानले आहेत. "धन्यवाद भाऊ. तू एक महान माणूस आहेस. तुझा आदर आहे", असे डु प्लेसिस म्हणाला.

डु प्लेसिस आणि रग्बी संघाचा कर्णधार सिया कोलिसी यांनी कोरोनाच्या संकटात गरजू लोकांना मदत केली होती. या दोन खेळाडूंनी केपटाऊनमधील गरजू लोकांना घरी अन्न पोचवण्याचे काम केले आणि त्यांना आवश्यक गोष्टी दोखील पुरवल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details