महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनीच्या 'त्या' विक्रमावर रैना म्हणतो, ''माही भाई....'' - Raina congratulated dhoni news

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच धोनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू ठरला. या विक्रमानंतर सुरेश रैनाने धोनीचे कौतुक केले आहे.

suresh raina glad that ms dhoni broke his big ipl record
धोनीच्या 'त्या' विक्रमावर रैना म्हणतो, ''माही भाई....''

By

Published : Oct 3, 2020, 3:22 PM IST

दुबई -चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळल्याबद्दल कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे अभिनंदन केले आहे. आयपीएलच्या १४व्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने आले होते. या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच धोनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू ठरला. या सामन्यात चेन्नईला हैदराबादकडून ७ धावांनी मात खावी लागली.

रैनाने ट्विटरवर लिहिले, "माही भाई आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळल्याबद्दल अभिनंदन. आनंद झाला, की तू माझा विक्रम मोडलास." सनरायझर्सविरुद्धचा सामना हा धोनीच्या आयपीएल कारकिर्दीचा १९४वा सामना होता. चेन्नईचा स्टार फलंदाज आणि यावर्षी आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने १९३ सामने खेळले आहेत. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ या वर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. २००८पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जने आठ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. २०१६ आणि २०१७मध्ये धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे दोन वर्षासाठी चेन्नईच्या संघावर बंदी आली होती.

सनरायजर्स हैदराबादने चेन्नईला १६५ धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या २० षटकांत ५ गडी बाद १५७ धावा झाल्या. हैदराबादचा युवा खेळाडू प्रियम गर्ग सामन्याचा मानकरी ठरला. गर्गने २६ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५१ धावा केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details