महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शस्त्रक्रियेनंतर रैना म्हणतो, 'मी लवकरच आपल्या पायांवर उभा राहीन' - ट्विटर आणि इन्स्टाग्राम

रैनाने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन आपल्या तब्येतेची माहिती दिली आहे.

शस्त्रक्रियेनंतर रैना म्हणतो, 'मी लवकरच आपल्या पायावर उभा राहीन'

By

Published : Aug 11, 2019, 5:27 PM IST

नवी दिल्ली -भारताचा स्फोटक फलंदाज सुरेश रैनाच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. नेदरलंडच्या अ‍ॅमस्टरडॅम येथे ही शस्त्रक्रिया पार पडली. यादरम्यान अनेक चाहत्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या. या शस्त्रक्रियेनंतर रैनाने आपण बरे असल्याचे कळवले आहे.

रैनाने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन आपल्या तब्येतेची माहिती दिली आहे. 'आता मी बरा असून डॉक्टर, परिवार आणि मित्रांचा मी आभारी आहे. ही समस्या खूप आधीपासून सुरु झाली होती. २००७ मध्ये मी पहिली गुडघ्याची शस्त्रक्रिया केली. आणि त्यानंतर मी मैदानावर उतरलो त्यानंतर मी खूप मेहनत घेतली.'

रैना पुढे म्हणाला, 'प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, दुसऱयांदा शस्त्रक्रियेचा हा निर्णय कठीण होता. कारण मला माहित होते की, मी खूप कालावधीसाठी मैदानाबाहेर राहू शकतो. आठवड्यापूर्वी मी यासाठी तयार नव्हतो. पण, हे दुखणे वाढले. आणि मला कळले की हाच शेवटचा पर्याय आहे.'

'मला आशा आहे की मी लवकरच आपल्या पायांवर उभा राहून मैदानावर जाईन. आणि उत्कृष्ठ कामगिरी करेन.' भारतीय संघाकडून सुरेश रैनाने १८ कसोटी, २२५ एकदिवसीय आणि ७८ टी- २० सामने खेळले आहेत. त्याने १८ कसोटी सामन्यातील ३१ डावांमध्ये खेळताना ७६८ धावा केल्या आहेत. तर २२६ एकदिवसीय सामन्यात त्याने ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा जमवल्या आहेत. यात ५ शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. ७८ टी-२० सामन्यात खेळताना १६०४ धावा केल्या असून त्यामध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details