मुंबई -सोनू, मिस्टर आयपीएल आणि चिन्ना थाला अशा नानविध नावांनी ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज सुरेश रैना आज 33 वर्षांचा झाला आहे. २७ नोव्हेंबर १९८६ रोजी मुरादनगर येथे रैनाचा जन्म झाला. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली रैनाने भारतीय संघात पुनरागमन केले होते.
हेही वाचा -IND VS WI : दुखापतीमुळे शिखर धवन संघातून आऊट, 'या' खेळाडूला संधी
रैनाने चेन्नई सुपर किंग्ज, आशिया इलेव्हन, भारत, झारखंड, रायजिंग पुणे सुपरजायंट आणि इंडिया अ संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. रैनाचे वडील काश्मीरचे तर आई हिमाचल प्रदेशची आहे. मात्र, काही अडचणींमुळे, रैनाचे कुटूंब गाझियाबादला स्थलांतरित झाले. रैनाने २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.
टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. रैनाने २२६ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने ५६१५ धावा केल्या आहेत. २०१७ पासून तो भारतीय संघाबाहेर आहे.
आयपीएलमध्ये रैनाची कारकिर्द नावारूपास आली. या स्पर्धेच्या पहिल्याच मोसमात चेन्नई सुपर किंग्जने त्याला २.६ कोटींची बोली लावून संघात घेतले होते. रैनाने १९३ आयपीएल सामन्यांमध्ये ५३६८ धावा केल्या आहेत. सीएसकेवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली तेव्हा, रैनाने गुजरात लायन्सचे नेतृत्व केले होते.