मुंबई - भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज तथा मिस्टर आयपीएलच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला. सुरेश रैनाची पत्नी प्रियंकाने सोमवारी गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
सुरेश-प्रियांका या कपलला २०१६ मध्ये मुलगी झाली होती आणि तिचे नाव गार्सिया असे ठेवण्यात आले. त्यानंतर आता २०२० मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. कोरोना विषाणूच्या गंभीर वातावरणात रैनासह त्याच्या चाहत्यांसाठी ही बातमी आनंदाची ठरली.
दरम्यान, सुरेश रैनाला गुडघ्याच्या दुखापतीने हैरान केलं होतं. यामुळे त्याने गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली. तो टी-२० विश्वकरंडक खेळण्यासाठी इच्छूक असून आगामी आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करण्यात त्याचा निर्धार आहे. त्याने २०१८ मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळला होता.