हैदराबाद -आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने मंगळवारी जेके लक्ष्मी सिमेंट लिमिटेडबरोबर शीर्षक प्रायोजित कराराची (title sponsor) घोषणा केली. २९ एप्रिलपासून आयपीएलच्या येत्या हंगामासाठी हा करार असणार आहे. २०१६ च्या आयपीएल स्पर्धेचे हैदराबादने जेतेपद पटकावले आहे.
जेके लक्ष्मी सिमेंट लिमिटेड हेही वाचा -जोफ्रा आर्चरला दिलासा, अपमान केलेल्या व्यक्तीला झाली शिक्षा
आयपीएलचा १३ वा हंगाम मुंबईत सुरू होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना २४ मे रोजी होणार आहे. कोलकाता येथे पार पडलेल्या आयपीएल लिलावात आपल्या आवडत्या खेळाडूला संघात घेण्यासाठी फ्रँचायझींनी करोडो रुपयांची बोली लावली. यात केकेआरने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर १५ कोटी ५० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं. मॅक्सवेल, नॅथन कोल्टर-नाइल, अॅरोन फिंच हे खेळाडूही करोडोपती ठरले.
आयपीएल २०२० साठी सनराईज हैदराबादकडे असलेले खेळाडू -
केन विल्यमसन (कर्णधार) डेविड वार्नर, मनीष पांडे, विजय शंकर, राशिद खान, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, जॉनी बेयरस्टो, ऋधिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्दार्थ कौल, शाहबाज नदीम, तुलसी थंपी, टी नटराजन, विराट सिंह, प्रियम गर्ग, मिचेल मार्श, संदीप बावंका, फॅबिएल अॅलेन, बिली स्टेनलेक, अब्दुल समद आणि संजय यादव.