हैदराबाद - इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक टॉम मूडी यांची क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली. ५५ वर्षीय मूडी २०१९च्या हंगामापर्यंत सनरायझर्सकडे होते. त्यांनी सात वर्षे या संघाला दिली.
दरम्यान, २०१६मध्ये मूडी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने आयपीएलचे जेतेपदही जिंकले होते. तसेच ५ वेळा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचला आहे.गेल्या वर्षी इंग्लंडचे विश्वचषक विजेते प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांची हैदराबादच्या मुख्य प्रशिक्षकपर्दी वर्णी लागली.