महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राहुलच्या नेतृत्वात पंजाबची उत्तम कामगिरी : गावसकर - सुनील गावसकर लेटेस्ट न्यूज

राहुलच्या संपूर्ण प्रदर्शनाबाबत भारताचे माजी सलामीवीर सुनील गावसकर यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, "लोकेश राहुलच्या नेतृत्वात त्यांची (किंग्ज इलेव्हन पंजाब) चांगली कामगिरी झाली आहे. राहुल कर्णधारपदाच्या भूमिकेत परिपक्व झाला आहे.

sunil gavaskar praises punjab skipper kl rahuls captaincy
राहुलच्या नेतृत्वात पंजाबची उत्तम कामगिरी : गावसकर

By

Published : Oct 26, 2020, 5:47 PM IST

नवी दिल्ली -आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब प्ले ऑफच्या शर्यतीसाठी झुंजत आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्त्वात पंजाबचा संघ चांगली कामगिरी करत आहे. लीगच्या आतापर्यंतच्या ११ सामन्यात राहुलने ५६७ धावा केल्या असून त्याने स्वत: कजे 'ऑरेंज कॅप' राखली आहे. राहुलच्या संपूर्ण प्रदर्शनाबाबत भारताचे माजी सलामीवीर सुनील गावसकर यांनी कौतुक केले आहे.

गावसकर म्हणाले, "लोकेश राहुलच्या नेतृत्वात त्यांची (किंग्ज इलेव्हन पंजाब) चांगली कामगिरी झाली आहे. राहुल कर्णधारपदाच्या भूमिकेत परिपक्व झाला आहे. जेव्हा ते जास्त धावा करत नाहीत, तेव्हा ते क्षेत्ररक्षण, गोलंदाजीत बदल करतात. त्याने ख्रिस जॉर्डनला १९वे षटक दिले. शेवटच्या षटकात १४ धावांच्या बचावासाठी त्याने अर्शदीप सिंगवर विश्वास दाखवला.'' शेवटच्या सामन्यात पंजाबने हैदराबादवर १२ धावांनी विजय मिळवला आहे.

केएल राहुल

गावसकर म्हणाले, "त्यांना विजयाचा मार्ग सापडला आहे. सुरुवातीच्या सामन्यांत त्यांचा शेवटच्या षटकात पराभव झाला आहे. शेवटच्या सामन्यात १२६ धावांच्या बचावासाठी त्यांना आत्मविश्वास दाखवण्याची गरज होती आणि त्यांनी ते केले. राहुलने फार चांगले नेतृत्व केले. "

सलग पाच सामने गमावल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ गुणतालिकेत सर्वात खाली होता, परंतू त्यानंतर त्यांनी सलग चार सामने जिंकले आहेत. आता १० गुणांसह ते पाचव्या स्थानी पोहोचले आहे. पंजाबचे अजून तीन सामने बाकी आहेत आणि त्याला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details