नवी दिल्ली -कोरोनामुळे मार्चपासून स्थगित असलेल्या क्रीडा उपक्रमांना हळूहळू सुरुवात होत आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी क्रिकेटच्या लवकर पुनरागमनाविषयी मत दिले आहे. ऑक्टोबरपर्यंत क्रिकेट खेळणे हे सुरक्षित असणार नाही, असे गावस्करांनी सांगितले.
गावस्कर म्हणाले, 'पुढील महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यामधील जैव-सुरक्षित वातावरणामधील कसोटी मालिका एक चांगले उदाहरण असेल. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ज्या वेगाने वाढत आहे, त्या दृष्टीने क्रिकेट खेळणे अवघड असल्याचे दिसते. आपल्याकडे सर्वजण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात. डॉक्टरांनी याविषयी सावधगिरी बाळगली आहे. परंतु, विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.'