नॉटिंगहॅम - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड गुरुवारी प्रशिक्षणात परतला आहे. ब्रॉडने ट्रेंट ब्रिज स्टेडियममध्ये सराव केला. या सरावादरम्यानचा एक व्हिडिओ ब्रॉडने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने केला गोलंदाजीचा सराव...पाहा व्हिडिओ
"हे शक्य करण्यासाठी पडद्यामागे बरेच कष्ट केले गेले आहेत. इंग्लंड क्रिकेट आणि ट्रेंट ब्रिजमध्ये सामील झालेल्यांचे आभार. इथे येऊन गोलंदाजी केल्यानंतर मला चांगले वाटले", असे ब्रॉडने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट रखडले आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) खेळाडूंना खासगी पद्धतीने सराव करण्यास मान्यता दिली आहे. एका अहवालानुसार, दोन मीटर अंतर राखणे आणि सतत हात धुण्यास सांगितले गेले आहे. शिवाय, चेंडूवर घाम आणि लाळ वापरण्यासही मनाई केलेली आहे.