महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

स्टुअर्ट ब्रॉडला आयसीसीने ठोठावला दंड - स्टुअर्ट ब्रॉड लेटेस्ट न्यूज

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसशी ब्रॉडने वाद घातला होता. त्यामुळे आयसीसीने ब्रॉडला सामना शुल्काच्या १५ टक्के दंड आणि त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुणही जोडला आहे.

Stuart Broad fined 15 per cent of match fee and hit with one demerit point
स्टुअर्ट ब्रॉडला आयसीसीने ठोठावला दंड

By

Published : Jan 29, 2020, 8:06 AM IST

जोहान्सबर्ग -इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसशी वाद घातल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने ब्रॉडला सामना शुल्काच्या १५ टक्के दंड आणि त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुणही जोडला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात ही घटना घडली होती.

हेही वाचा -Asia Cup : पाकला यजमानपद खुशाल करु द्या, पण भारत पाकमध्ये खेळणार नाही - BCCI

या कसोटीच्या शेवटच्या दिवशी सॅम कुर्रनने केलेला थ्रो प्लेसिसच्या पॅडवर लागला होता. यानंतर ब्रॉड आणि प्लेसिस यांच्यात वाद झाला. 'ब्रॉडने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन केले आहे ज्यात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चुकीच्या भाषेचा वापर समाविष्ट आहे', असे आयसीसीने म्हटले.

गेल्या २४ महिन्यात ब्रॉडच्या खात्यात दोन वेळा डिमेरिट गुण जोडण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details