लंडन -इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने मंगळवारी चॅरिटीसाठी पैसे गोळा करण्यासाठी हाफ मॅरेथॉनमध्ये धावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्टोक्स प्रथमच हॉफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) आणि नॅशनल चिल्ड्रन्स क्रिकेट चॅरिटी चान्स टू शाइनसाठी तो निधी जमवणार आहे.
स्टोक्स म्हणाला, ''मी हाफ मॅरेथॉनचा नेहमी विचार केला होता. मात्र, मला तसे करायला कधीच मिळाले नाही. आम्ही लॉकडाउनमध्ये होतो, म्हणून मला वाटले ही बाहेर जाण्याची उत्तम संधी आहे. या मॅरेथॉनद्वारे मी काही निधी उभारण्याचादेखील प्रयत्न करू शकतो. "