लंडन - इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथने दमदार प्रदर्शन करत चाहत्यांची मने जिंकली. या मालिकेत स्मिथने खेळलेल्यापैकी ८२ धावांची खेळी ही त्याची कमी धावसंख्येची खेळी होती. तर, २११ धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च खेळी होती.
हेही वाचा -कणकवलीच्या अथर्वचे प्रतिष्ठेच्या लडाख मॅरेथॉनमध्ये यश!
'स्मिथने कितीही चांगले प्रदर्शन केले तरी तो चीटर म्हणूनच ओळखला जाईल', अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा माजी खेळाडू स्टीव हार्मिसनने दिली आहे. स्मिथच्या बॉल टेंपरिंग प्रकरणामुळे हार्मिसन खुप नाराज आहे. त्याने मैदानावर कितीही चांगली कामगिरी केली तरी तो चीटर म्हणूनच ओळखला जाईल, असे हार्मिसनने म्हटले आहे.