दुबई - ऑस्ट्रेलिया संघाने अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १८५ धावांनी पराभव करत मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली. या विजयात स्टिव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यांनी उल्लेखणीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोठा हातभार लावला. याच कामगिरीच्या जोरावर स्मिथ आणि कमिन्स यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत आपापल्या अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे.
हेही वाचा -भारतानेच श्रीलंकेच्या खेळाडूंना धमकावलं, पाक क्रीडामंत्र्यांचा आरोप
चौथ्या कसोटी सामन्यात स्टिव्ह स्मिथने पहिल्या डावात २११ दुसऱया डावात ८२ धावांची खेळी केली यामुळे त्याच्या गुणांमध्ये ३४ ने वाढ झाली आहेत. तो सद्या ९३७ गुणांसह कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीतील अव्वल स्थानावरील पकड घट्ट केली आहे. दरम्यान, चौथी कसोटी सुरू असताना स्मिथ ९०४ गुणांवर तर कोहली ९०३ गुणांवर होता. या दोघांतील अंतर फक्त एका गुणचे होते. मात्र आता ते ३४ इतके झाले आहे.
हेही वाचा -'या' कारणामुळे कुलदीप, चहलला आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून वगळले - प्रसाद
गोलंदाजीत पॅट कमिन्सने चौथ्या कसोटी सामन्यात १०३ धावा देत ७ गडी बाद केले आहेत. यामुळे त्याचे आता गुण ९१४ इतके झाले असून तो क्रमवारी अव्वल क्रमाकांवर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा हा ८५१ गुणांसह दुसऱ्या, तर भारताचा जसप्रीत बुमराह ८३५ गुणांसह तिसऱया क्रमांकावर आहे.