लंडन -अॅशेसच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरच्या वेगवान चेंडूने जखमी झालेला स्टीव स्मिथ सामन्याच्या उरलेल्या सत्रातून संघाबाहेर पडला आहे.
लॉर्ड्सवर सुरू असलेल्या अॅशेसच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव स्मिथला जोफ्रा आर्चरचा वेगवान चेंडू लागला. मानेवर आदळलेल्या या चेंडूने स्मिथ जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. काही वेळानंतर स्मिथ पुन्हा मैदानात उतरला. त्याने आणखी ९ चेंडूत १२ धावांची भर घालत तो व्यक्तिगत ९२ धावांवर बाद झाला.