नॉटिंगहॅम - विश्वकरंडकात आज खेळल्या जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर २८९ धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाचे सर्व प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर स्टीव स्मिथ, अॅलेक्स कॅरी आणि नथन कुल्टर-नाइल या तिघांनी मोक्याच्या क्षणीशानदार खेळी करत कांगारुंना आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली.
WI VS AUS : स्टीव स्मिथ आणि नॅथन कुल्टर-नाईलची झुंजार खेळी, ऑस्ट्रेलियाचे वेस्ट इंडिजसमोर २८९ धावांचे आव्हान - Australia
नथन कुल्टर-नाइलची ६० चेंडूंत ९२ धावांची वादळी खेळी
स्टीव स्मिथ
ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अॅलेक्स कॅरीने ४५, स्टीव स्मिथ ७३ आणि नथन कुल्टर-नाइल ९२ धावांची वादळी खेळी. या तिघांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजयासाठी वेस्ट इंडिजला २८९ धावांचे आव्हान दिले आहे.
वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने सर्वाधिक ३, तर शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस आणि आंद्रे रसल या तिघांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.
Last Updated : Jun 6, 2019, 8:03 PM IST