लंडन - कसोटीतील महत्वाची मानल्या जाणाऱ्या यंदाच्या अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. चेंडू छेडछाड प्रकरणी शिक्षा भोगून संघात परतलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथने भारताच्या चेतेश्वर पुजाराला पछाडले आहे. त्याने इंग्लंडविरुध्दच्या पहिल्याच कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतक ठोकले. या दोन शतकामुळे जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी त्याने झेप घेतली.
बंदीची शिक्षा भोगलेल्या स्मिथने भारताच्या पुजाराला पछाडले, गाठले नवे स्थान - smith overtook pujara
तिसऱ्या स्थानावर असेलेल्या पुजाराची आता एका स्थानाने घसरण झाली आहे.
![बंदीची शिक्षा भोगलेल्या स्मिथने भारताच्या पुजाराला पछाडले, गाठले नवे स्थान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4062347-239-4062347-1565110696923.jpg)
तिसऱ्या स्थानावर असेलेल्या पुजाराची आता एका स्थानाने घसरण झाली आहे. नव्या क्रमवारीनुसार स्मिथचे ९०३ तर पुजाराचे ८८१ गुण झाले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा ९१३ गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर या क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ९२२ गुणांसह अव्वलस्थानी आहे.
स्मिथने अॅशेसच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतकी खेळी केली आहे. त्याने पहिल्या डावात १४४ आणि दुसऱ्या डावात १४२ धावा केल्या आहेत. दरम्यान, स्मिथने अॅशेसमध्ये खेळताना आतापर्यंत १० शतके केली आहेत. त्याच्या पुढे ब्रॅडमॅन (१९ शतके) आणि इंग्लंडचे जॅक हॉब्ज (१२ शतके) हे दिग्गज फलंदाज आहेत.