नवी दिल्ली - श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथने तब्बल साडेतीन वर्षानतर संघात पुनरागमन केले. मोहालीमध्ये भारताविरुद्ध स्मिथने शेवटचा टी-२० सामना खेळला होता. घोषणा करण्यात आलेल्या संघातून मार्कस स्टोईनिसला डच्चू मिळाला आहे.
हेही वाचा -सायना नेहवाल संकटात!..नाराज होऊन केले परराष्ट्र खात्याला ट्विट
यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये स्टोईनिसने फक्त ८७ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. स्टिव्ह स्मिथसोबत सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. धडाकेबाज फलंदाज ख्रिस लीन आणि डार्सी शॉर्ट या फलंदाजांना मात्र संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.