नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशभरात सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या घटनांमुळे लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. बीसीसीआयने हे आवाहन करताना भारताचा विश्वासू फलंदाज चेतेश्वर पुजाराचे उदाहरण दिले.
बीसीसीआयने ट्विटरवर पुजाराचा एक फोटो पोस्ट केला आहे. “पुजाराच्या कुटुंबाप्रमाणेच तुम्हीही स्वतः च्या घरात रहा”, असे बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले. लॉकडाउनदरम्यान संपूर्ण वेळ मुलीचा सांभाळ करण्यात जातो, असे पुजाराने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.