महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

SL VS PAK : खेळाडूंच्या विरोधानंतरही श्रीलंकेचा संघ करणार पाकिस्तान दौरा - लाहिरु थिरिमाने

श्रीलंकेच्या निवड समितीने पाकिस्तान दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी संघाचे नेतृत्व लाहिरू थिरीमाने याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर टी-२० मालिकेची धुरा दासुन शनाका याच्याकडे देण्यात आली आहे.

खेळाडूंच्या विरोधानंतरही श्रीलंकेचा संघ करणार पाकिस्तान दौरा

By

Published : Sep 11, 2019, 8:02 PM IST

कोलंबो - सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेच्या संघातील १० खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. यामुळे या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. मात्र, विरोध केलेल्या खेळाडूंना वगळून श्रीलंकेच्या निवड समितीने संघ निवडला आहे आणि हा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे.

श्रीलंकेच्या निवड समितीने पाकिस्तान दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी संघाचे नेतृत्व लाहिरू थिरीमाने याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर टी-२० मालिकेची धुरा दासुन शनाका याच्याकडे देण्यात आली आहे. श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे.

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ -

लाहिरू थिरिमाने (कर्णधार), सदीरा समाविक्रमा, अविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, अँजेलो परेरा, मिनोद भानुका, वानिंदु हसारंगा, लक्षन संदाकन, नुवान प्रदीप, कसून रजिता, लाहिरु कुमारा आणि इसुरु उडाना.

श्रीलंकेचा टी-२० संघ -

दासुन शनाका (कर्णधार), सदीरा समाविक्रमा, अविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, अँजेलो परेरा, मिनोद भानुका, वानिंदु हसारंगा, लक्षन संदाकन, नुवान प्रदीप, कसून रजिता, लाहिरू कुमारा, इसुरु उडाना आणि भानुका राजपक्षा.

ABOUT THE AUTHOR

...view details