कोलंबो -आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शेहान मदुशनकाला श्रीलंकेच्या पोलिसांनी अमलीपदार्थ (हेरॉइन) ठेवण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लंकेच्या मदुशनकाने बांगलादेशविरुध्द एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती.
दंडाधिकाऱ्यांनी 25 वर्षीय मदुशनकाला दोन आठवड्यांसाठी कोठडी सुनावली आहे. रविवारी त्याला पनाला शहरात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे दोन ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉइन होती, असे पोलिसांना सांगितले आहे.