चेस्टर ली स्ट्रीट -आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत खेळल्या गेलेल्या 35व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 9 गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मात्र आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर श्रीलंकन फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि 49.3 षटकांमध्ये अवघ्या 203 धावांमध्ये सर्वबाद झाला.
SL vs RSA :दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर ९ गडी राखून दणदणीत विजय - ICC
आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर श्रीलंका 203 धावांमध्ये सर्वबाद
रिव्हर साईड क्रिकेट मैदानावर खळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 37.2 षटकांमध्ये एका गड्याच्या बदल्यात दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार फाफ डु प्लेसिसने 96 तर आमलाने 80 तर धावांची नाबाद खेळी केली. श्रीलंकेकडून फक्त लसिथ मलिंगाला एकमेव विकेट घेता आला.
दक्षिण आफ्रिकेकडून ख्रिस मॉरिस आणि ड्वेन प्रिस्टोरियस यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर कगिसो रबाडाला २ गड्यांना माघारी धाडण्यात यश आले. श्रीलंकेकडून परेरा आणि फर्नांडोने 30 तर मेंडीसने 23 आणि डीसिल्वाने 24 धावा केल्या. .