चटगांव -इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर श्रीलंकेचा संघ येत्या मे महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात तीन एकदिवसीय खेळवण्यात येतील. बांगलादेशने त्यांचा आगामी श्रीलंका दौरा स्थगित केला आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी लंका करणार 'या' देशाचा दौरा
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष (क्रिकेट ऑपरेशन्स) अक्रम खान यांनी माध्यमांना सांगितले, "श्रीलंका मेमध्ये बांगलादेशात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी येईल. ही मालिका वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग आहे.''
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष (क्रिकेट ऑपरेशन्स) अक्रम खान यांनी माध्यमांना सांगितले, "श्रीलंका मेमध्ये बांगलादेशात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी येईल. ही मालिका वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग आहे. आम्ही लवकरच श्रीलंकेला भेट देऊ, अशी आम्हाला आशा होती. परंतु अद्याप दौऱ्याच्या तारखांचा निर्णय झालेला नाही.''
गतवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये बांगलादेशला श्रीलंकेत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची होती. परंतु कोरोनामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली. बांगलादेश सध्या वेस्ट इंडिजबरोबर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे.