कोलंबो -यंदाच्या विश्वकरंडक उपविजेत्या संघासमोर श्रीलंकेने आपल्या २२ खेळाडूंची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट संघाने आज बुधवारी ही घोषणा केली.
विश्वकरंडक उपविजेत्या संघासमोर श्रीलंकेने ठेवले 'स्पेशल-२२' खेळाडू - २२ खेळाडूंची घोषणा
या मालिकेसाठी दिमुथ करुणारत्नेलाच कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
या मालिकेसाठी यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी श्रीलंकेचा कर्णधार म्हणून नेमलेल्या दिमुथ करुणारत्नेलाच कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या मालिकेपासूनच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात होईल. ओशाडा फर्नांडो आणि कुशल मेंडिस या दोघांना संघात स्थान देण्यात आले आहे. ज्या श्रीलंकेच्या संघाने आफ्रिकेला त्यांच्याच मैदानावर धूळ चारली होती, त्या संघात या दोघांचा समावेश होता.
एसएलसीने दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा मंत्री हरिन फर्नाडो यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी २२ खेळाडूंना मंजुरी दिली आहे. यातूनच अंतिम १५ खेळाडू निवडले जातील. १९८४ पासून न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेत १५ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
संघ -
- दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, लाहिरू थिरिमाने, कुशल मेंडिस, कुशल जनिथ परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डी सिल्वा, अँजेलो परेरा, ओशाडा फर्नांडो, धनुष्का गुणाथिलका, शेहान जयासूर्या, चामिका कुरणारत्ने, दिरुवान परेरा, अकिला धनंजय, लसिथ इमबुलदेनिया, लक्षण संदकाना, सुरंगा लकमल, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, कासुन रजिथा, असिथा फर्नाडो.