कोलंबो - श्रीलंका क्रिकेट मंडळाने (एसएलसी) आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी आज १५ सदस्यीय श्रीलंकन संघाची घोषणा केली. या संघाच्या नेतृत्वाची धुरा दिमुथ करुणारत्नेकडे देण्यात आली आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या वनडे संघाचे कर्णधारपद हे लसिथ मलिंगाकडे होते. मात्र त्याची या पदावरून हाकालपट्टी करून दिमुथकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विश्वचषकासाठी श्रीलंकन संघाची घोषणा, करुणारत्नेकडे नेतृत्वाची धुरा
लसिथ मलिंगाची कर्णधारपदावरून हाकालपट्टी
करुणारत्नेच्या नेतृत्वात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्यांच घरात ऐतिहासिक कसोटी मालिका २-० ने जिंकली होती. ३० वर्षीय करुणारत्नेने २०१५च्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकही वनडे सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत श्रीलंकेने त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवल्याने क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे.
असा असेल श्रीलंकेचा संघ
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, कुशल परेरा, धनंजय डिसेल्वा, कुशल मेंडिस, आयसुरु उडाना, मिलींदा सिरिवर्धना, अविष्का फर्नांडो, जीवन मेंडिस, लाहिरु थिरिमन्ने, जेफ्री वंडरसे, नुवान प्रदीप, सुरांगा लकमल