कोलंबो -आगामी पाकिस्तान दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील १० खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली आहेत. सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेला पाकिस्तानसोबत मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळायची आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव १० खेळाडूंनी या मालिकेस जाण्यास नकार दर्शवला आहे.
पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका?.. 'नको रे बाबा'
सुरक्षेच्या कारणास्तव दहा खेळाडूंनी या मालिकेस जाण्यास नकार दर्शवला आहे. या दहा जणांमध्ये एकदिवसीय संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने , टी-२० संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुशल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांचा समावेश आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) या दहा खेळाडूंची माहिती दिली.
या दहा जणांमध्ये एकदिवसीय संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने , टी-२० संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुशल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांचा समावेश आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) या दहा खेळाडूंची माहिती दिली.
एसएलसीने दिलेल्या माहितीनुसार, मर्यादित षटकांची क्रिकेट मालिकेसाठी सुरक्षेचा विचार खेळाडूंपुढे मांडण्यात आला. त्यानंतर या खेळाडूंनी मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री हेरिन फर्नांडो म्हणाले, 'या खेळाडूंच्या कुटुंबाने सुरक्षेची चिंता व्यक्त केली होती. त्यांना सांगण्यात आले होते की, खेळाडूंना पूर्ण संरक्षण देण्यात येईल.'
कराचीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २७ आणि २९ सप्टेंबर, २ ऑक्टोबरला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ५,७ आणि ९ ऑक्टोबरला तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.