मुंबई- कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तर दुसरीकडे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारत आणि बांगलादेश यांच्यासोबत तिरंगी मालिका खेळवण्याची तयारी सुरू केली आहे. या संदर्भातील वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे.
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी आधिकारी अॅश्ले डीसिल्वा यांनी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले, 'आम्ही तिरंगी मालिकेबद्दल बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाला विनंती केली आहे. याबाबत त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर येईल, याची आम्ही वाट पाहत आहेत.'
लंकन क्रिकेट बोर्डाने मालिका खेळवण्याची तयारी दाखवली असली तरी भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये सध्या लॉकडाउन सुरू आहे. दोन्ही देशातील सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासाला बंदी घातली आहे. यामुळे ही मालिका होईल की नाही, हे पाहावे लागेल.