कोलंबो- चीनमधून सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग आता जगभरातल्या १६६ हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात सुमारे २ लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून मृतांचा आकडा १५ हजारांवर पोहोचला आहे. प्रत्येक देश आपापल्या कुवतीनुसार यावर उपाययोजना करत आहे. श्रीलंकेतही कोरोनाचा फैलाव झाला असून यावर उपाययोजना करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने, २५ मिलियन श्रीलंका रुपये भारतीय चलनात विचार केल्यास १ कोटी रुपये सरकारला दिले आहेत. श्रीलंका बोर्डाने याची घोषणा आपल्या संकेतस्थळावरून केली.
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने सांगितले की, 'देशातील सर्व स्थानिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. आम्ही सरकारच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. आमचे खेळाडूही जनजागृतीसाठी चाहत्यांना आवाहन करत आहेत.'