कोलंबो - श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा याला कोरोनाची लागण झाली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आज (सोमवार) याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
माध्यमांच्या वृत्तानुसार, श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. त्याआधी लाहिरुला कोरोनाची लागण झाली आहे.
एसएलसीने प्रसिद्धपत्रकात म्हटलं आहे की, 'लाहिरुची रविवारी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. लाहिरू सरकारकडून कोरोनाबाबतीत तयार करण्यात आलेल्या प्रोटोकॉलचे पालन करत आहे.'