गॅले -दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध लंकेने विजयारंभ केला. गॅले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेने न्यूझीलंडचा सुपडा साफ करत, 6 गडी राखून विजय मिळवला. यजमान संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या १२२ धावांच्या जोरावर लंकेला हा विजय साकारता आला.
बिनबाद १३३ धावसंख्येवरुन लंकेने पाचव्या दिवसाचा खेळ सुरु केला. सलामीवीर करुणारत्ने आणि लाहिरू थिरिमाने यांनी ही धावसंख्या १६१ पर्यंत नेली. त्यानंतर विल्यम सोमरविलेने थिरिमानेला ६४ धावांवर बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतरच्या दुसऱ्याच षटकात एजाज पटेलने कुशल मेंडिसला बाद केले.