दुबई -आयपीएलमध्ये दुबई येथे झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ८८ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकत हैदराबादने गुणतालिकेत सहावा क्रमांक पटकावला आहे. या सामन्यात सलामीवीराची संधी मिळालेल्या वृद्धिमान साहाने ८७ धावांची खेळी करत दोन मोठ्या विक्रमांची नोंद केली.
वृद्धिमान साहाने पॉवर प्लेच्या षटकांमध्ये सर्वोत्तम स्ट्राईक रेट असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने स्थान मिळवले. आयपीएलच्या कारकिर्दीत पॉवरप्लेमध्ये किमान ४०० पेक्षा जास्त चेंडू खेळत त्याने १३७.५०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. शिवाय, १९०पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने धावा काढत दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक करण्याचा विक्रमही केला. वॉर्नर आणि साहा अर्धशतके ठोकली. याआधी २०१६मध्ये ख्रिस गेल-विराट कोहली जोडीने तर २०१७मध्ये ख्रिस लीन-सुनील नरिन जोडीने असा पराक्रम केला होता.