महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 15, 2021, 9:48 AM IST

ETV Bharat / sports

श्रीशांतची यशस्वी जयस्वालसोबत स्लेजिंग, मग मिळाले 'असे' उत्तर

मुंबईच्या फलंदाजीच्या सहाव्या षटकात श्रीशांतने गोलंदाजी केली. या षटकात यशस्वीने सुरुवातीला श्रीशांतला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर श्रीशांत त्याच्याकडे पाहत राहिला. यानंतर यशस्वीने त्याला सलग दोन षटकार खेचले. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. केरळला मुंबईने १९७धावांचे लक्ष्य दिले होते, जे केरळने सहज पूर्ण केले.

Sreesanth sledges Yashasvi Jaiswal, the batter gives perfect response on next ball
श्रीशांतची यशस्वी जयस्वालसोबत स्लेजिंग, मग मिळाले 'असे' उत्तर

मुंबई -२०१३मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला वेगवान गोलंदाज श्रीशांत सात वर्षांनंतर क्रिकेटमध्ये परतला आहे. यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो सात वर्षानंतर आपली पहिली स्पर्धा खेळत आहे. केरळ आणि मुंबई दरम्यानच्या सामन्यात श्रीशांतने १९ वर्षीय यशस्वी जयस्वालला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, यशस्वीने आपल्या पद्धतीत त्याला प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा - गाबा कसोटी : उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवर तंबूत

मुंबईच्या फलंदाजीच्या सहाव्या षटकात श्रीशांतने गोलंदाजी केली. या षटकात यशस्वीने सुरुवातीला श्रीशांतला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर श्रीशांत त्याच्याकडे पाहत राहिला. यानंतर यशस्वीने त्याला सलग दोन षटकार खेचले. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. केरळला मुंबईने १९७धावांचे लक्ष्य दिले होते, जे केरळने सहज पूर्ण केले.

९.५ षटकांत मुंबईचे सलामीवीर जयस्वाल आणि आदित्य तारे यांनी ८८ धावांची भागीदारी केली. कर्णधार सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड आणि शिवम दुबे यांनीही शानदार खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details