मुंबई - विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी मोठी चर्चा होत आहे. अनेक दिग्गज चौथ्या स्थानी फलंदाजीसाठी योग्य असलेल्या खेळाडूंची नावे सुचवित आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने एक ट्विट केले आहे.
शंकर-पंतची गरज नाही, स्पृहा म्हणते चौथ्या क्रमांकासाठी भारताने माझा विचार करावा - ICC
स्पृहा जोशीने आपल्या ट्विटमध्ये क्रिकेट खेळतानाचा फोटो शेअर केला आहे.
स्पृहा जोशी
स्पृहा जोशीने आपल्या ट्विटमध्ये क्रिकेट खेळतानाचा एक फोटो शेअर करत म्हटले आहे की, भारतीय संघात चौथ्या स्थानी फलंदाजीसाठी माझा विचार करायला हरकत नाहीय.
दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून शिखर धवन बाहेर पडल्याने लोकेश राहुल सलामीला येत आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाहीय. त्यामुळे अनेकांनी चौथ्या क्रमांकासाठी ऋषभ पंतला पंसती दिली आहे.