मुंबई -आज रविवारचा दिवस बॉलिवूड विश्वासाठी धक्कादायक ठरला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. सुशांतच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. या घटनेनंतर क्रीडाविश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर क्रीडाविश्वात हळहळ - grief over actor sushant's suicide
सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. सुशांतच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही आहे. या घटनेनंतर क्रीडाविश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
सुशांतचा जन्म बिहारच्या पाटण्यात 21 जानेवारी 1986 रोजी झाला. सुशांतने मॅकेनिकल इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले होते. सुशांतने त्याच्या करीअरची सुरुवात 'किस देश मे है मेरा दिल' या मालिकेतून केली. मात्र, 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांत घराघरात पोहोचला. ती मालिका अर्ध्यावर सोडून सुशांतने त्याची पावले मोठ्या पडद्याकडे वळवली. सुशांतने 'काय पो छे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमांस, पीके, धोनी द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, सोनचिढीया आणि छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या.