लढा कोरोनाशी : मोदींच्या आवाहनाला क्रीडा क्षेत्रातून प्रतिसाद, खेळाडूंनी केली दिव्यांची आरास - Sports players light candles in response to PM Modi's appeal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी दिला प्रतिसाद.
लढा कोरोनाशी : मोदींच्या आवाहनाला क्रीडा क्षेत्रातून प्रतिसाद, खेळाडूंनी केली दिव्यांची आरास
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे, कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला खेळाडूंनी प्रतिसाद दिला आहे.