Irani Cup: विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मिळवला विजय . - Nagpur
पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भाचा विजय.
![Irani Cup: विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मिळवला विजय .](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2466991-204-1c83975e-05c3-4f10-8217-38e8d5fd831c.jpg)
नागपूर - विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या इराणी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाने शेष भारताविरूद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला आहे. शेष भारताने दुसऱ्या डावात ४ बाद ३७३ धावा करत विदर्भासमोर २८० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाने ५ गडी गमावत २६९ धावा केल्या.
दुसऱ्या डावात शेष भारताकडून हनुमा विहारीने १८० आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने ८७ धावांची शानदार खेळी केली. तर ५ व्या क्रमाकांवर आलेला फलंदाज श्रेयस अय्यरने ५२ चेंडूत ६१ धावा फटकावत शेष भारताची धावसंख्या ३७४ पर्यंत पोहोचवली. विदर्भाच्या दुसऱ्या डावात संजय रघूनाथने ४२, अथर्व तायडेने ७२, तर गणेश सतिशने केलेल्या ८७ धावांची खेळी केली.