महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'आयसीसी'च्या वर्णद्वेषविरोधी मोहिमेला सचिनचा पाठिंबा, म्हणाला... - Sachin on icc

आयसीसीने वर्णद्वेषविरोधी सुरू केलेल्या मोहिमेला, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पाठिंबा दर्शवला आहे.

Sport has power to change world: Sachin Tendulkar shares ICC's video on diversity
वर्णद्वेषाविरोधी मोहिमेला सचिनचा पाठिंबा, म्हणाला...

By

Published : Jun 7, 2020, 6:51 AM IST

मुंबई- आयसीसीने वर्णद्वेषाविरोधी सुरू केलेल्या मोहिमेला, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पाठिंबा दर्शवला आहे. त्याने आयसीसीच्या ट्विटला रिशेअर करताना दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांचे क्रीडाक्षेत्रावरील प्रसिद्ध विधान पोस्ट केले आहे.

आफ्रिकन वंशाचा अमेरिकेचा नागरिक जॉर्ज फ्लॉयड याचा पोलीस अत्याचारामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरात वर्णद्वेषाविरुद्ध आवाज बुलंद होऊ लागला आहे. वेस्ट इंडीजचे खेळाडू ख्रिस गेल आणि डेरेन सॅमी यांच्यासह अनेक खेळाडूंनी देखील वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवला आहे. सॅमीने तर आयसीसीला कृष्णवर्णीय खेळाडूंच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.

आयसीसीने यावर विविधतेशिवाय क्रिकेट अस्तित्वहिन असल्याचे म्हटले. हे सांगताना आयसीसीने शुक्रवारी ९० सेकंदांची व्हिडिओ क्लिप पोस्ट केली. ही क्लिप २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आहे. यात जोफ्रा आर्चर न्यूझीलंडविरुद्ध अखेरचे षटक टाकताना दिसत आहे. आर्चर हा वेस्ट इंडीजमध्ये जन्मलेला असूनही त्याने इंग्लंडला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात कशा प्रकारे मोलाची भूमिका बजावली, हे 'आयसीसी'ला याद्वारे दाखवून द्यावयाचे होते.

सचिननेही आयसीसीच्या या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. त्याने, 'खेळामध्ये संपूर्ण जग बदलण्याची क्षमता आहे. किंबहुना सगळ्यांना एकत्रित आणण्याची ताकद खेळामध्ये आहे'. नेल्सन मंडेला यांचे हे विधान सध्याच्या स्थितीला साजेसे आहे, असे म्हटलं आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी वर्णभेद करणे न थाबंवल्यास जगात अनेकांचा या कारणामुळे मृत्यू होईल, असेही मत सचिनने व्यक्त केले आहे.

हेही वाचा -आयपीएल भारतात की भारताबाहेर?...वाचा बीसीसीआयचे मत

हेही वाचा -72 दिवस अडकला एअरपोर्टवर, तरीही घानाच्या फुटबॉलरला राहायचंय भारतातच, कारण...

ABOUT THE AUTHOR

...view details